हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-
हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठू रुक्माईच्या दर्शनासाठी हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक डिव्हिजन नांदेड यांच्याकडे आषाढी एकादशी निमित्त हिंगोली मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील वारकऱ्यांना नांदेड ते पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती त्या मागणीला रेल्वे विभागाने हिरवी झेंडी देऊन नांदेड ते पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वेच्या फेऱ्या सुरू केल्याचे पत्र पाठवले आहे…
या बाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिनांक 16 ते 17 जुलै रोजी विठुराच्या दर्शनासाठी भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना नांदेड ते पंढरपूर या गाडीच्या दोन विशेष रेल्वे फेऱ्या नांदेड विभागाने सुरू कराव्या अशी मागणी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती त्या मागणीला अखेर रेल्वे विभागाने हिरवी झेंडी दाखवत दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू केल्याचे पत्र हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील यांना दिले आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रयत्नाने हिंगोली लोकसभे मधील वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी दोन विशेष रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत याची सर्व वारकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आव्हान हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जनतेला केले आहे….