काँग्रेस पक्षाचा हदगावात नियोजित कार्यक्रम असताना अचानक भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवून जनतेला व कार्यकर्त्यांना इतरत्र वळवण्याची आमदारांची खेळ.
हदगाव दि.२८: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष व नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष रेखाताई चव्हाण या सध्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघांमध्ये चांगल्याच ऍक्टिव्ह मोड वर आहेत. त्याची धडकी स्थानिक आमदाराला बसल्याचे दिसून येत आहे आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अचानक काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ठराविक कार्यक्रमाला न जाता येत रात्र वळविण्याचा डाव साधण्यासाठी तामसा येथे भूमिपूजन व उद्घाटन व लोकार्पण सोहळा आयोजित करून डॉ. चव्हाण यांच्या गणपती सजावट स्पर्धा व गुरु गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याला न जाण्यासाठी चक्क आमदारांनी ही खेळी रचल्याचे दिसून येत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये नेहमी घराणे शाळेचे वर्चस्व कायम राहत आहे ह्या मुळे यावेळेस काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्याचे काम सुरू केले आहे याचीच धडकी मनात धरून तामसा येथे ठेवलेल्या कार्यक्रमाचे अचानक निमंत्रण चक्क आमदार स्वतः फोन करून लोकांना, कार्यकर्त्यांना डॉक्टर रेखाताईंच्या कार्यक्रमासाठी न जाण्यासाठी आवाहन करत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पत्रकारांना फोन करून बातम्या न छापण्याचे आवाहन व कार्यक्रमास अनुपस्थित राहण्याची विनवण्या सुधा कराव्या लागत असून त्यातील एक क्लिप ही वायरल झाली आहे. चक्क काँग्रेस जिल्हाध्यक्ष व खासदारांना आमच्या साहेबांनी फोन करून अनुपस्थित राहण्याचे आदेश दिल्याचे कार्यकर्त्याने सांगितले. एक महिला पदाधिकारी विधानसभेसाठी इच्छुक झाल्या आणि आमदाराचे धाबेच दणाणले. पाच वर्षे घरात असलेल्या आमदारांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे अगदी पत्रकार,कार्यकर्ते यांना विविध प्रकारे धमकावले जात असल्याची चर्चा सध्या हदगाव शहरात जोरात सुरू आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड