हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील सर्वच गावांमधील नदी नाल्याना पूर आल्याने नदी काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापसासह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्या नांदेड प्रभारी जिल्हाअध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी हिमायतनगर येथील तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देऊन मागणी केली
या बाबत सविस्तर वृत्त असे की आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तातडीची कुठलीही मदत दिली नाही केवळ घोषणाबाजी करून हे सरकार वेळ काढू पणा करत आहे असा आरोप करत हिमायतनगर मतदारसंघातील नुकसान ग्रस्त भागातील शेतकरी एन सणासुदीच्या दिवसात मोठ्या संकटात सापडला आहे त्यामुळे मी मागील 3 दिवसात 24 गावांना भेटी दिल्या त्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भात तात्काळ ठोस निर्णय घेऊन हदगाव हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्या नांदेड प्रभारी जिल्हाअध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी हिमायतनगर येथील तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देऊन केली आहे हदगाव हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने या मतदारसंघातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे मागील 3 दिवसात 24 गावांना दिलेल्या भेटी दरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष डॉ.रेखाताई चव्हाण यांनी दि8,9 सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकांची पाहणी केली त्यात मोजे पळसपुर, डोल्हारी, सीरपल्ली, शेलोडा, एकंबा,कोठा,कोठा तांडा, सिरंजनी, कामारी,पिंपरी, विरसनी,वाघी,दिघी, टेंभूर्णी, बोरगडी,तांडा 1, तांडा 2, धानोरा, वारांगटाकळी,मंगरूळ,खैरगाव ज,वडगाव ज, सिबदरा,करला सह आदी गावातील पिकांची परिस्थिती अत्यंत विदारक झाल्यामुळे त्यांच्या नुकसानी बाबतचा अहवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे पाठवून माझ्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मी आग्रही भूमिका घेऊन नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट 50 हजार रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना हा अहवाल दाखविणार आहे असे सांगितले व आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी असंख्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन हिमायतनगर येथील तहसीलदार यांची भेट घेऊन तालुक्यात झालेल्या नुकसानीची मदत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी आज एक लेखी निवेदन देऊन तहसीलदार यांच्या कडे मागणी केली आहे….
चौकट
तात्काळ मदत जाहीर न केल्यास शेतकऱ्यांना घेऊन रुमणे मोर्चा काढू….
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दोऱ्या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानीची महाराष्ट्र राज्य सरकारने शंभर टक्के आनेवारी दाखवून या मतदारसंघातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांना घेऊन हिमायतनगर तहसील कार्यालयावर रूमने मोर्चा काढू असा इशारा सुद्धा काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई पा चव्हाण गोरलेगावकर यांनी दिला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड