हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात मागील आठ दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. त्यातच पैनगंगा नदी पात्राचे दरवाजे उघडल्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांचे हातून नातं नुकसान झाले आहेत त्यांच्या शेतातील पिके संपूर्णतः खरडून गेल्यामुळे त्यांच्यावर एन सणासुदीच्या दिवसात उपासमारीची वेळ आली आहे . यामुळे हिमायतनगर हदगाव – तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील सर्व पिके पाण्याखाली आल्याने त्यांच्या शेतीतील सोयाबीन, कापूस यासारखी पिके उन्मळून गेली आहेत. या नुकसानीचे चित्र दि 6 सप्टेंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकाचे पाणी केली व माझा शेतकरी राजा हतबल झाला आहे त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी केली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर, डोल्हारी पैनगंगा नदीकाठच्या परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दिनांक ०६ सप्टेंबर रोजी सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत त्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी सांगितले कि माझ्या मतदार संघातील बहुतांश भागाचा मी दौरा केला आहे, जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही. या पुराच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. झालेली अतिवृष्टी एवढी भंयक होती कि, अनेक शेतकऱ्यांची जनावरे देखील यात वाहून गेली तर बहुतांश नागरिकांची घरे पडल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या अतिवृष्टीची तात्काळ दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक नुकसान भरपाई तात्काळ देऊन त्यांना टेन सणासुदीच्या दिवसांमध्ये मदत करावी अशी मागणी अगं हिमायतनगर विधानसभेच्या डॉ. रेखाताई चव्हाण यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून महाराष्ट्र सरकारला केली आहे यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी व नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते