ता. प्र.दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.२१: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त धर्माबाद शहरात “एक वही, एक पेन” हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी या हेतूने, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, फुलेनगर, धर्माबाद येथे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची संकल्पना ताहेर पठाण यांची असून, आयोजनाची जबाबदारी सिद्धोधन हनुमंते, गजानन कुरुंदे, लक्ष्मीकांत बाजनवाड, राजू जल्लोड तसेच शंकर अण्णा मित्र मंडळ, धर्माबाद यांनी घेतली आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी कोणतेही अवांतर खर्च न करता, एक वही किंवा एक पेन स्वरूपात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. जमा झालेले शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. “एक वही, एक पेन देऊन , मुला-मुलींच्या भविष्याचं सोन करा” या घोषवाक्याने प्रेरित झालेल्या या उपक्रमाला शहर व परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असून . सामाजिक बांधिलकी जोपासत अशा प्रकारच्या उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.यासाठी नागरिक, संस्था, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड