हिमायतनगर प्रतिनिधी/- आगामी जिल्हा परिषद,नगर पंचायत,ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,रवींद्र चव्हाण ,नांदेड जिल्ह्याचे भाजपा नेते खा.अशोकराव चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार हिमायतनगर येथील भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान अधिक गतिमान करून सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लावले असल्याचे सध्या दिसून येत आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यावर आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे एक हाती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील भाजपाचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी तालुक्यात सदस्य नोंदणी अभियान अधिक व्यापक करण्यासाठी ॲक्शन मोडवर उतरल्याचे दिसून येत आहे शहरातील व बाजारपेठेतील डोर टू डोर नागरिकांच्या भेटी घेऊन भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना विनंती करून हदगाव विधानसभेवर आगामी काळात एकहाती सत्ता आणण्यासाठी शहरातील प्रत्येक वॉर्डांमध्ये भाजपा सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे त्यात सर्व प्रमुख पदाधिकारी संयोजक व मंडल अध्यक्षांना २५० सदस्य केले तरच पदाधिकारी राहता येईल अशा सक्तसुचना देऊन शहरातील सर्व मंडळांतील प्रमुखांना व बूथ प्रमुखांना शहरातील ,गावातील प्रत्येक चौका चौकात व डोर टू डोर जाऊन ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू करण्यास सांगितले भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी हे सदस्य नोंदणी अभियान हिमायतनगर तालुक्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे असे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी सांगितले…