नांदेड दि.१०: सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपीक विनोद कंधारे या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी जामीन देण्याचा अर्ज नाकारल्यामुळे या दोघांची दिवाळी तुरूंगातच साजरी होणार आहे. भ्रष्टाचार करू नका बाबांनो आपल्याला सणांच्या दिवशी सुध्दा तुरूंगात जायची वेळ येते.
1 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम परिमंळाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत आणि त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपीक विनोद किशनराव कंधारे या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 6 लाख 40 हजारांची लाच घेतांना पकडले होते. या संदर्भाने दाखल झालेल्या गुन्ह्यात 2 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी दोघांना 5 दिवस पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, अर्थात तुरूंगात झाली. 7 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये नामांकित असलेल्या पाच वकीलांनी त्यांना जामीन मिळावा असा अर्ज केला. या जामीन अर्जावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे काय म्हणणे आहे ते सांगण्यासाठी न्यायालयाने दोन दिवसांचा वेळ दिला. 9 नोव्हेंबर रोजी या प्रकरणात मोठ-मोठ्या पाच वकीलांनी अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपीक विनोद कंधारे यांना का सोडणे आवश्यक आहे. या संदर्भाने लांब लचक युक्तीवाद केला होता. या प्रकरणात जवळपास 75 लाख रुपयांची रोख रक्कम गजेंद्र राजपूत यांच्या घरी आणि विनोद कंधारे यांच्या कार्यालयातील कक्षाच्या डेक्समध्ये सापडले होते. झालेला युक्तीवाद ऐकून 9 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी उद्या अर्थात आज 10 नोव्हेंबर रोजी आदेश करतो असे सांगितले होते. सायंकाळी 5 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार गजेंद्र राजपूत आणि विनोद कंधारे यांचा जामीन अर्ज न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी फेटाळला होता. पण खात्रीलायक वृत्त मिळत नसल्यामुळे वास्तव न्युज लाईव्हला हे वृत्त प्रसिध्द करण्यात उशीर झाला. पण आता हे सुनिश्चित झाले आहे की, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक 403/2023 मध्ये न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम परिमंडळाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत आणि त्या कार्यालयातील वरिष्ठ लिपीक विनोद किशनराव कंधारे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
पाच भारदस्त वकीलांची फौज त्यांना वाचवू शकली नाही.
या प्रकरणात गजेंद्र राजपूत आणि विनोद कंधारे यांच्यावतीने ऍड. महेश कनकदंडे, ऍड.आर.जी. परळकर, ऍड. अनुप पांडे, ऍड.बालाजी शिंदे आणि ऍड.गिरीश नागापुरकर या नामांकित वकीलांनी सादरकरण केले होते. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी सादरीकरण केले होते. पण न्यायालयाने एवढा मोठा भ्रष्टाचार प्रकरणात जामीन नाकारून भ्रष्टाचार करणे अयोग्यच आहे कारण त्यामुळे आपल्याला दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी सुध्दा तुरूंगात राहावे लागेल हे सिध्द झाले. त्यामुळे वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आव्हाण करत आहे की, बाबानों भ्रष्टाचार करू नका नाही तर दिवाळी सुध्दा तुरूंगात साजरी करावी लागेल. पण तुरूंगात सुध्दा दिवाळीसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतात आणि त्यामुळे गजेंद्र राजपूत आणि विनोद कंधारे यांनी वाईट वाटू घेण्याचे कारण नाही. कारण आज तुम्ही ज्या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहात हा दिवस तुमच्या दोघांच्या जीवनात स्मरणीय राहणार आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड