उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगाला दिले आश्वासन
नांदेड दि.१: दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांना घेराव घालून निवेदन देण्याचा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला दिला होता. परंतु प्रशासनाच्या वतीने मुख्य करून जिल्हा पोलिस प्रशासनाकडून दिव्यांग संघटनेची व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विमानतळावर भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी अजित दादा पवार यांनी दिव्यांगांच्या मागण्यांचा त्वरित विचार करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सविस्तर वृत्त असे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार हे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश मेळाव्यास आज आले असता विमानतळावरच बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने त्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनातील मागण्या म्हणजे आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करून न घेणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. स्थानिक स्वराज संस्था,नागरी स्वराज्य संस्थांमधील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न करणा-या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. एस.टी बससह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस दिव्यांगांवर कारवाई करण्यात यावी. स्वयंरोजगाराठी दिव्यांगांना शासकीय गाळे व २०० स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी. मुकबधीर कर्णबधिर दिव्यांगांना चिन्हांकित वाहन परवाने देण्यात यावे. दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना ५० टक्के सबसिडीच्या दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे या व इतर मागण्यांचे निवेदन आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना देण्यात आले व मागण्या त्वरित मान्य करून सोडविण्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले. यावेळी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे.आदित्य पाटिल.पिंटु बद्देवाड.प्रदिप हणवते.सुनिल जाधव.रवि कोकरे.शेषेराव वाघमारे.नागनाथ कामजळगे.सय्यद आरिफ सय्यद अली.अतीख हुसेन.भोजराज शिंदे.कार्तिक भरतीपुरम किरणकुमार न्यालापल्ली.राजु इराबत्तीन. शहाबाज सलीम पठाण.नागेश निरडी.ढगे.अजय गोरे.गुलाबराव पंडीत.भाग्यश्री नागेश्वर.कल्पना सक्ते आणि सविता गवते उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड