नांदेड. दि.२९: जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्गत जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि ३ व ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले असून या संदर्भात जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील दिव्यांग शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांसह व्यवस्थापकीय अधीक्षक व समिती प्रमुखांची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली.
३ डिसेंबर जागतिक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिव्यांगाच्या शाळेतील विदयार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत घेण्यात येते.दिनांक ३ फेब्रुवारी रोजी दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा पोलीस परेड ग्राउंड येथे होणार आहेत. तसेच दिनांक ४ फेब्रुवारी रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांगाच्या अस्थिव्यंग, मूकबधिर, मतिमंद, अंध या प्रकारातील जवळपास ८५० मुले मुली सहभागी होणार आहेत. या दिव्यांग विदयार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सर्व मुख्याध्यापक, व्यवस्थापकीय अधीक्षक, विविध समित्याचे प्रमुख व सदस्य यांच्या उपस्थितीत दिव्यांग विदयार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, भोजन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, मैदानाची व्यवस्था, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन या सह अनेक विषयायांचा आढावा घेतला.या आढावा बैठकीला वै. सा. का. कैलास मोरे यांच्यासह सर्व शाळेतील मुख्याध्यापक, सर्व समिती प्रमुख व सदस्य उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड