सत्यप्रभा न्यूज नेटवर्क
नांदेड दि.६: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक रविंद्र संगनवार, निमंत्रक ॲड. प्रदीप नागापूरकर, पत्रकार परिषदेचे माजी संघटक प्रकाश कांबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव राम तरटे, प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, लक्ष्मण भवरे,महानगर सरचिटणीस सुरेश काशिदे, उपाध्यक्ष प्रल्हाद लोहेकर, प्रशांत गवळे आदिंची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड