विजय पाटील
कन्नड दि : १७ विधानसभा मतदारसंघाचा आज, १७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा घेतला. स्ट्राँगरूम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, गटविकास अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी चंद्रहार ढोकणे, यतिन कोठावळे तसेच सर्व झोनल अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी कन्नड तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, नोडल अधिकारी व झोनल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट दिली.
साहित्य वाटप, जमा करणे, स्ट्राँग रूम येथे भेट देऊन पाहणीही केली. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण करीत असलेल्या कामाचे पूर्ण ज्ञान असले पाहिजे. निवडणूक आयोगाने सर्व बाबींचा विचार करून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सर्व सूचनांची माहिती आपण घेतली पाहिजे. मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसेच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घ्यावा. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास करुन सज्ज असावे,असे निर्देश त्यांनी दिले.
#छत्रपती संभाजी नगर#सत्यप्रभा न्यूज