नांदेड दि.३ : भारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, हे अभियान नांदेड जिल्ह्यातही राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी नेमून दिलेल्या गावात मुक्कामी राहणार आहेत. अशी माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे. हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार आहेत.
शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. या अंतर्गत 50 हजार यूनिट्समध्ये भाजपाचे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल अशी माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
प्रत्येक युनिटमध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल असेही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
गाव चलो अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असून, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे नायगाव येथे मुक्कामी असणार आहेत. संजय कौडगे, मराठवाडा विभाग संघटनमंत्री सगरोळी ता. बिलोली, देविदास राठोड प्रदेश सचिव भाजपा भोकर शहर, डॉ. संतुकराव हंबर्डे भाजपा जिल्हाध्यक्ष दक्षिण ग्रामिण मुखेड शहर, अॅड. किशोर देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष उत्त्र ग्रामिण भोकर तालुक्यातील पाळज, महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते लोहा तालुक्यातील जानापुरी, प्रवीण साले महाविजय 2024 मराठवाडा प्रमुख कैलासनगर नांदेड, सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा टेळकी ता. लोहा प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख नांदेड तालुक्यातील धानोरा मक्ता, भाजपा नांदेड लोकसभा निवडणुक प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर देगलूर तालुक्यातील सोमुर, माजी जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे हे नायगाव तालुक्यातील भोपाळा, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड बिलोली तालुक्यातील पाचपिपळी, माधवराव उच्चेकर मुखेड तालुक्यातील बेटमोगरा, शिवराज पाटील होटाळकर नायगाव तालुक्यातील गडगा येथे मुक्कामी राहणार असून पक्षाचे आमदार त्यांच्या त्यांच्या सोई प्रमाणे मुक्काम करतील व कार्यक्रम कळवतील अशी माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड