👉अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम….
हिमायतनगर/प्रतिनिधी/- तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार तालुका शाखेच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकुश सदावर्ते आणि जिल्हाध्यक्ष आयु. शुध्दोधन हनवते यांच्या हस्ते उपस्थित रुग्णांला फळे वाटपाचा नाविन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रम राबवुन नवा पायंडा पत्रकार संघटनेच्या माध्यमातुन पाडल्यामुळे,अनेकांकडुन या उपक्रमा विषयी कौतुक करण्यातआले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांची आठवण सर्वांना नेहमी राहो यासाठी सहा जानेवारी हा दिवस दर्पण दिन व बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती करून सर्वत्र साजरा केला जातो याचेच अवस्थेचे साधन हिमायतनगर तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे वाटप करून केला हा उपक्रम दरवर्षी व नेहमी प्रमाणे होत राहणे गरजेचे आहे.अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष देवानंद गुंडेकर,शहराध्यक्ष अनिल नाईक, तालुका उपाध्यक्ष प्रशांत राहुलवाड, ता.महासचिव गणपत नाचारे यांनी सफरचंद व केळी फळ वाटपाचे नियोजन केले होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर धोंडोपंत बनसोडे,संपादक धम्मपाल मुनेश्वर,संपादक गंगाधर गायकवाड, यश अकॅडमीचे संचालक शेख हनीफ सर यांनी पत्रकार दिनानिमित्त सखोल अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सय्यद,अखिल,शेख चातारकर,अधिपरिचारीका,कर्मचारी,रुग्णांचे नातेवाईक सह आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.