लातूर प्रतिनिधी विजय पाटील दि : २०
उदगीर :येथील शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प पुन्हा पूर्ववत सुरू करावा. ही मागणी घेऊन उदगीर येथील दूध योजना पुनर्जीवन समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी या समितीचे मोतीलाल डोईजोडे, विधीज्ञ नरेश सोनवणे, प्रा एस एस पाटील, अजित शिंदे, अहमद सरवर, ओंकार गांजुरे, चंद्रकांत टेंगेटोल, कपिल शेटकर, यांच्यासह माजी आमदार शिवराज तोंडचीरकर, स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष अजीम दायमी, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, युवा नेते स्वप्निल जाधव, आशिष पाटील राजूरकर, प्रमोद पाटील, शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अरुणाताई लेंडाने, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सचिन साबणे, विधीज्ञ रमाकांत चटनाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंजूर खा पठाण, शिवसेनेचे विष्णुकांत चिंतलवार, राष्ट्रवादीचे शंकरराव मुक्कावार, काँग्रेसचे विनोद सुडे, आम आदमी पार्टीचे नेते रंगा राचुरे, माधव टेपाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीत शासकीय दूध योजना उदगीर येथे पूर्वत सुरू झाली पाहिजे. यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचे ठरले.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर