ता. प्र.दत्तात्रय सज्जन
धर्माबाद ता.प्र दत्तात्रय सज्जन दि.११: गेल्या सोळा वर्षापासून अगदी तटस्थ राहून वास्तववादी रोखठोक पत्रकारिता करणारे धर्माबादचे दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना यावर्षी पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत व सामाजिक कार्यात प्रसिद्धीच्या झोतात न राहता पडद्यामागूनअग्रेसर राहत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यात अग्रेसर असल्यामुळे त्यांना २०२४ या वर्षात सलग दोन पुरस्कार मिळाले आहेत.
महात्मा कबीर समता परिषद या मानांकित संस्थेचा महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार यासाठी त्यांची सन २०२३-२०२४ साठी निवड करण्यात आली असून तशा प्रकारचे निवड पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी त्यांना पाठवले असून या महिन्याच्या शेवटपर्यंत या पुरस्काराचे वितरण होणार नांदेड येथे होणार आहे.
त्याचप्रमाणे नांदेड येथील दलित चळवळीतील अग्रेसर व्यक्तिमत्व संजय निवडंगे यांच्या युग कवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदगे या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंती सोहळ्यातील ‘तुफानातील दिवे’हा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार संजय कदम यांना जाहीर झाला आहे.
दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संजय कदम यांनी आपल्या पत्रकारितेतून सामाजिक,राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात जे लोकांच्या मनात आहे ते त्यांच्या पेपरच्या पानात आणायला मोठे धाडस करीत एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
संजय कदम यांच्या उपरोक्त मिळालेल्या दोन्ही पुरस्कारामुळे त्यांचे धर्माबाद शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड