धर्माबाद तालुका प्रतिनिधी |धर्माबाद शहरात दिनांक २६ जून रोजी आमदार राजेश पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजीत करण्यात आले होते त्या दिवशी शहरात आमदार साहेब हिंदु चे मते घेता आणि विकास कधी करणारं? एका विशिष्ट समुदायाला खुश करून इतर समुदायाकडे आपण का दुर्लक्ष करत आहात? अशा प्रकारचे मजकूर टाकून मनसेच्या(MNS) वतीने बॅनर लावण्यात आले होते हे बॅनर आमदार राजेश पवार यांना चांगलेच जिव्हारी लागले म्हणूनच त्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या फिर्यादी करून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर थेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले या प्रकाराने शहरातील हिंदुत्ववादी विचार धारेची शक्ती एकवटली ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपा (BJP) हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे.आमदार पण हिंदू आहेत मग हिंदु धर्माच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आम्ही बॅनर मधून मांडले यात चूक काय त्याच बरोबर लवण्यात आलेल्या बॅनर वर अतीशय सभ्य भाषा वापरून आदरयुक्त मागणी केली असे असतानाही गुन्हे दाखल करून आमचे खच्छिकरण केले जात असल्याची प्रतिक्रीया यावेळी हिंदुत्ववादी युवकांनी व्यक्त केली आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला विकासा करीता आपल्या लोकप्रतिनिधी कडे मागणी करण्याचा हक्क आहे आणि विद्यमान आमदार तर आमच्या हककाचे असूनही आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले होते पण ते स्वतःचे अपयश झाकण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून हिंदुत्ववादी विचार धारेच्या संघटनेचा आवाज दाबण्यासाठी थेट गुन्हे दाखल करून युवकांचे संघटन खच्छिकरण करत असल्याची प्रतिक्रीया यावेळी व्यक्त करण्यात आली.
शेकडो युवकांनी अतीशय शिस्तीत पोलीस ठाण्यात येऊन दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे.
धर्माबाद तालुका हा हिंदुत्ववादी विचारधरेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो.त्यातूनच भाजपला किंवा इतर हिंदुत्ववादी विचारधारेच्या पक्षाला मोठे मतदान मिळते.ज्या अपेक्षेने आम्ही मत देतो त्याची उतराई म्हणून सार्वजनिक विकासाचे कामे पूर्ण करा अशी मागणी करणे आमचा हक्क असूनही उलट गुन्हे दाखल करून हिंदुत्ववादी विचार धारेचे संघटन कमकुमत केले जात आहे.ही बाब अतीशय खेदजनक आहे. मुळात आमच्या विकासाकडे दुर्लक्ष का? असे आम्ही विचारले यात दुसऱ्या कोणत्याही समुदायाचे नावही उलेख केलेला नसतांना आमच्यावर गुन्हे दाखल करून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आले असल्याची प्रतीक्रिया या शिस्टमंडळ ने व्यक्त केली आहे .