Devendra Fadnvis : पाच राज्यांच्या विधानसभा(Election Result) निवडणुकीनंतर आता लोकसभेतही भाजपच विजयी होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पाचपैकी तीन राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याची परिस्थिती आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय टीमचे आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजच्या निकालांचा कल पाहता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतही भाजप विजयी होईल यात शंका नाही. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले आहे, त्यांच्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलं आहे. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजीच असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या-त्या राज्यातल्या भाजपच्या राष्ट्रीय टीमचे हे श्रेय असून मी सर्वांचच मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाची मतं दहा टक्केपेक्षा देखील जास्त वाढलेली आहे आणि विशेषतः छत्तीसगड राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ही टक्केवारी आहे. मध्य प्रदेशमध्ये आठ टक्क्यानी वाढली, असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
विरोधकांकडून आता पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्यात येणार आहे. विरोधकांनी कोणावरही खापर फोडलं तरीही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील असून महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीआंश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या आहेत. लोकसभेमध्येही तेच आपल्याला पाहायला मिळणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. जो विकास आणि विश्वास मोदीजींनी तयार केला आहे, तोच डबल इंजिन सरकारने तयार केला आहे, त्याच्या आधारावर मला विश्वास आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनताच पाहायला मिळणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या असून, चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपनं जवळपास विजय मिळवला आहे. लोकसभेपूर्वी सेमीफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजपसाठी पुन्हा एकदा मोदी फॅक्टरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदानापूर्वी मोदींनी तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आक्रमक भाषणं देत सभा गाजवल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्याऐवजी भाजपने संपूर्ण निवडणूक पीएम मोदींच्या चेहऱ्यावर लढवली आणि लोकांना कमळावर मतदान करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम तीन राज्यातील निकालात दिसून आला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड