तथागत गौतम बुद्धांची मूर्ती दिली भेट
नांदेड दि.६: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथराव शिंदे हे नांदेड येथे आले असता शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी शिंदे यांचे भव्य स्वागत केले असून जगाला शांतीचा संदेश तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकित मुहायुतीचा विजय झाल्यानंतर मतदारांचे आभार माणण्यासाठी नांदेड शहरात आले असता राज कॉर्नर येथे उत्तर विधानसभा मतदारसंघातील तरोडा (बू) येथील मतदार व कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख
मंगेश कदम, माजी नगरसेविका सौ. ज्योती मनीष कदम, अँड धम्मपाल कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे भव्य पुष्पहार व शाल घालून स्वागत केले. तसेच तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली.याप्रसंगी अशोक देशमुख तरोडेकर,बाळू पेंटेवाड, आनंद सावंत,अमोल पंडित,बाळू कागडे,भास्कर गच्चे, अरविंद पवनकर,मनीष कदम,मयूर कोकरे,विक्की गायकवाड, गौतम सोनकांबळे,प्रवीण वाघमारे, सोनू सोनकांबळे,राहुल मोरे,भैया सावंत, विलास कदम, पप्पू धनजकर, सिद्धू वाघमारे, भीमराव व्यवहारे, जनार्धन ढवळे,संतोष पवार,अमित लिंबेकर,विजय बगाटे, आशिष इरलोड, सुनील नागोरे,कार्तिक तेलंग,यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
चौकट
चैतन्यनगर येथे हि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत
आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या उत्तर मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीने चैतन्यनगर येथील चौकात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे विकास देशमुख, सचिन देशमुख,गोमाटे मामा,केरबा कल्याणकर, सोनू वाघमारे, अमित थूले, सिद्धार्थ वाठोरे, सोनू कोल्हे, विशाल साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून भव्य स्वागत केले.