वसमत दि५: श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा “शिवा” असेही म्हणले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते.
श्री गणेश यांच्या दहा दिवसीय उत्सवात सकाळ ,संध्याकाळ किमान आरती च्या वेळी विदयुत पुरवठा खंडीत होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी.
न. प. प्रशासनानी सर्वत्र स्वच्छता राहील या करिता यंत्रना सज्ज ठेवून सर्वत्र स्वच्छते बाबत प्रबोधन करावे .शहराच्या प्रमुख रस्त्यावर पाणी साचु नये या करिता वाहुण गेलेल्या रोड वरील खड्डे बुजवावेत .उत्सवा प्रसंगी महीला ,मुलींच्या संरक्षणाबाबत दामीनीपथक सक्रीय करावेत .
अशा मागण्या नागरीक करत आहेत प्रशासनाने दखल घ्यावी .
गणपती उत्सव निमित्त सुविधा देण्यात यावे वसमत शहरात सध्या गणपती उत्सव सुरू होणार आहे या निमित्ताने दहा दिवस आरतीच्या वेळेस सहकारी संध्याकाळ लाईट ची व्यवस्था देण्यात यावी व लाईट जाऊ नये याची दक्षता घ्यावी वसमत शहरातील सर्व धार्मिक स्थळा करून स्वच्छता करून घेण्यात यावी वसमत शहरातील सर्व नाली खड्डे बुजविण्यात यावे नाली स्वच्छ करून घेण्यात यावी नालीच्या आजूबाजूला डस्ट पावडर टाकून स्वच्छ करण्यात यावे या सर्व सुविधा देण्यात यावी अशी मागणी सर्व वसमत शहरातील भक्ताकडून करण्यात आलेली आहे या सर्व माहिती सर्व अधिकाऱ्यापर्यंत पत्रकार म्हणून कदरी यांनी पोहोचवली आहे.
सत्यप्रभा न्युज #नांदेड