👉🏻ओबीसी बांधव सुद्धा आगामी काळात यांना ह्यांची जागा दाखवेल
हिमायतनगर प्रतिनिधी/- सध्या महाराष्ट्रातले राजकीय वातावरण जाती नुसार तापल्यामुळे जो तो येतो आणि उठसूट काही पण बोलत असतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या बाबीवर कुठेतरी अंकुश निर्माण व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावर ओ.बी.सी. नेते प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या बद्दल बेताल भाषेत वक्तव्य करून त्यांना मारहाणीची भाषा करणाऱ्या माधव देवसरकर यांच्यावर कठोरात कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी हिमायतनगर शहरातील सकल ओ.बी.सी. समाज बांधवांनी येथील पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जातीवरून राजकारण तापत चालले आहे याची गांभीर्यपूर्वक पोलीस प्रशासनाने दखल घेऊन सोशल मीडियावर ओ.बी.सी. नेते तथा संघर्ष योद्धा प्रा. लक्ष्मण हाके हे ओ.बी.सी.आरक्षणाचा प्रश्न संविधानिक पद्धतीने मांडून मागील अनेक दिवसांपासून ते महाराष्ट्रात संघर्ष करत आहेत त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या भाषेत शब्द वापरून महाराष्ट्रातील मंत्री छगन भुजबळ व धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून बेताल वक्तव्य करणाऱ्या माधव देवसरकर यांच्यावर हिमायतनगर येथील पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मागणी हिमायतनगर शहरातील सकल ओबीसी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे सोशल मीडियावर बेताल बोलणाऱ्या माधव देवसरकर हे सतत ओ.बी.सी. समाजाच्या भावना दुखावत आहेत अशा भावना दुखण्याचे वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष, अहिंसा पसरण्याचे कटकारस्थान यांच्याकडून नेहमी होत आहे त्यामुळे समस्त ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर गुन्हा दाखल करून ह्या नंतर अशे अक्षेपार्ह वक्तव्य त्यांकडून होणार नाही अशी कबुली त्यांच्याकडून घ्यावी अशी मागणी हिमायतनगर शहरातील सकल ओबीसी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे यावेळी ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव जर्गेवाड, दिलीप राठोड, रवी जोनापल्ले, राम जाधव, नागेश शिंदे,प्रकाश हाके, सुनील चव्हाण, सुनील आडे ,दिनेश राठोड, गजानन रेणलेवाड, संतोष खिल्लारे,सुनील ढगे सह आदी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता…