जिल्ह्यातील पहिली शाळा; ग्रामपंचायतही झाली आएसओ
नांदेड२६: देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा त ग्रामपंचायतीस आयएसओ नामांकन मिळाले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांना हे नामांकन प्रदान करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, आयएसओ ऑडिटर अनिल येवले व योगेश जोशी यांची उपस्थिती होती. हणेगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा आयएसओ नामांकनात जिल्हयात पहिली ठरली आहे. तर तालुक्यात हानेगाव ग्रामपंचायतीने प्रथम आएसओ नामांकन मिळविले. शाळा व अंगणवाडीने कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून मानांकन मिळविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील पहिली कन्या शाळा ठरली आहे. हे मानांकन पुढे टिकवून ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी मीनल करनवाल यांनी केले. यावेळी ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोरे, विस्तार अधिकारी बालाजी उमाटे, शिक्षणाधिकारी तोटरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, सरपंच शारदादेवी राठोड, उपसरपंच मुजीबोदीन चमकुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वियसहाय शुभम तेलेवाड, गट समन्वयक सुनील भोपाळकर, बाळासाहेब शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी अमोल जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर सूत्रसंचालन संदीप चलवे सर यांनी केले.
चौकट
सीईओंनी केले इको विट उपक्रमाचे कौतुक,
जिल्ह्यात उपक्रम राबविणार
येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सपासून तयार ‘इको विट’ तयार केल्या आहेत. यातून त्यांनी शाळेत लावलेल्या झाडांभोवती कुंपन, ओठा व ईतर बांधकामासाठी त्याचा वापर केला आहे. टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सपासून तयार करण्यात आलेल्या इको विट या अभिनव संकल्पनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी भरभरून कौतुक केले. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल प्रेरणादायी असून, शाळेच्या या प्रयत्नांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच, जिल्ह्यातील इतर शाळा आणि संस्थांनीही या उपक्रमाचा अवलंब करावा, अशी इच्छा व्यक्त करून, त्यांनी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यार असल्याचे सांगीतले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड