नांदेड दि. १० :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळस्तरावर १० वी साठी ०२३८२-२५१६३३तर १२वीसाठी ०२३८२-२५१७३३हा हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले नावे व भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव) मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक बारावी साठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.
माध्यमिक (दहावी) साठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस.एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं. 7620166354 हे भ्रमणध्वनी क्रमांक असतील. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत साधावा.
भयमुक्त-तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्र. परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल. नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कच्छवे बी.एम. 9371261500, कारखेडे बी.एम. 9860912898, सोळंके पी.जी. 9860286857, पाटील बी. एच. 9767722071 असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड