नांदेड प्रतिनिधी /-जिल्ह्यात हृदयरोग निर्मितीचा प्रचार आणि प्रसार शासन आपल्या स्तरातून करत आहे त्याचेच औचित्य साधून नांदेड इनरव्हील क्लब तर्फे २९ सप्टेंबर २०२४ रोजी र्हदयरोग दिनाचे औचित्य साधून CPR म्हणजे कार्डीयाक रिसेसिटेशनचा प्रकल्प श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर , रवि नगर,जुना कौठा नांदेड येथे घेण्यात आला या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा.सौ.विमल यन्नावार व सचिव प्रा.सोनाली देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला
या बाबत सविस्तर वृत्त असे की एखाद्या व्यक्तिचे र्हदयक्रिया बंद पडते म्हणजे हार्ट अटॅक येतो तेंव्हा त्याचा जीव वाचविण्या साठी ही एक प्राथमीक उपचार पद्धती आहे ह्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्या करिता श्री.शंकरराव चव्हान वैद्यकीय महाविद्यालयातील भूलतज्ञ विभागातील डाॅ. रूचिता व डाॅ. अनिकेत ह्यांनी मानवी पुतळ्या वर प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थितांकडून ही क्रीया करून घेतली ह्या प्रकल्पा करिता भूलशात्र विभाग प्रमुख डाॅ. देशमुख, डाॅ. तोटावार व डाॅ. यन्नावार ह्यांचे विशेष सहकार्य लाभले होते या कार्यक्रमा करिता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराची जागा येथील विश्वस्थ श्री. पांडुरंग काकडे व श्री. पांडे सर ह्यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळे नांदेड इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा.सौ.विमल यन्नावार व सचिव प्रा.सोनाली देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला….