मुंबई दि. 29- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महु (मध्यप्रदेश) येथील जन्मभूमी स्मारकाला आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सहकुटूंब भेट दिली. भिमजन्मभूमी स्मारकात महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महु येथील जन्मभूमी स्मारकाला साडे सात एकर जमीन मिळाली पाहिजे अशी येथील जनतेची मागणी असून या मागणीच्या पूर्ततेसाठी संरक्षण मंत्री ना.राजनाथ सिंह यांची आपण भेट घेणार आहोत असे ना.रामदास आठवले यांनी आश्वासन दिले.
भिमजन्मभुमी स्मारक महु येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली सहकुटूंब भेट
भिमजन्मभूमी स्मारकाला दरवर्षी लाखोंची गर्दी येथे वाढत आहे. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ म्हणून येथील स्मारकाला देशभरातुन देश-विदेशातुन लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या स्मारकाला जागा अपुरी पडत आहे. या स्मारकासाठी अधीक जागेची आवश्यकता असल्यामुळे महु जन्मभूमी लगत असलेल्या जागेपैकी साडेसात एकर जमीन भिम जन्म भूमी स्मारकाला आपण मिळवुन देणार आहोत. त्यासाठी भारत सरकारचे संरक्षणमंत्री मा.ना. श्री. राजनाथ सिंह यांची आपण भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.
भिमजन्म भूमी स्मारक महु येथे येणा-या अनुयायांना भिमजन्म भुमी स्मारक समिती तर्फे मोफत चहा,पाणी, भोजन, अल्पोहार देण्यात येतो. त्या सेवेला मदत म्हणून आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी वैयक्तिक 50 हजार रुपयांची मदत दिली. भीम जन्मभूमी स्मारकाला वार्षिक खर्च म्हणून मध्य प्रदेश राज्य सरकार ने आपल्या अर्थसंकल्पात 2 कोटींची तरतूद करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
यावेळी ना. रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. सिमाताई आठवले पुत्र जित आठवले आणि आदि कुटुंब त्यांच्या समवेत होते.
भिमजन्म भूमी स्मारक येथे दरवर्षी गर्दी वाढत आहे. त्यामुळे या भागामध्ये या स्मारकाचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे साडेसात एकर जमीन ही मिळवुन या ठिकाणी डाँ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उभारण्याची गरज आहे. भिमजन्म भुमी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी साडेसात एकर जमीन या स्मारकाला आपण मिळवुन देणार आहोत. या जागेमध्ये संविधान भवन उभारले जावे; तसेच
विपश्यना सेंटर, सामाजिक सभागृह, आदिंचा या स्मारक विस्तारांमध्ये समावेश असेल. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले. हा भाग लष्काराच्या भागाची सर्व जमीन महु येथे लष्करी छावणी होती. आणि या भागातील जमीन ही लष्कराच्या मालकी हक्काची असल्यामुळे भारताचे संरक्षणमंत्री ना. राजनाथ सिंह यांची भेट घेवुन आपण यातील साडेसात एकर जमीन भिमजन्म भुमी स्मारकाला आपण मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड