मुदखेड ता.प्र.नांदेड दि.२९: नांदेड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी मुदखेड शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची दि २८ मार्च २०२४ रोजी बैठक घेण्यात आली व तसेच नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांचीही उपस्थीती राहणार आहे.
जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाची चर्चा व कांग्रेसपक्षावर असलेली निष्ठा यावर सर्वांनी कांग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी पटवून त्याच ताकतीने वसंतराव चव्हाण यांना मुदखेड तालुक्यातून मोठा प्रतिसाद देऊन निवडून आनन्याच्या संदर्भात दि.२९ मार्च २०२४ रोजी दुपारी ० २:३५ वाजता नांदेड रोड लगत असलेल्या बिस्ट्रॉंग जिमच्या बाजूस या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला मुदखेड तालुका व शहर काँग्रेस पक्षातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.यावेळी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोत्तवार, शंकर राठी,माजी नगरसेवक कैलास गोडसे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, केशव कदम, करीम खाँसाहेब, बंदी आली खाँ पठाण, गोविंद कालानी,तेजाब पाटील मुंगल,शाम चंद्रे, मोहम्मद गौस अब्दुल नबीसाब इलयास अब्बासी, सुर्यकांत चौदंते, मोहंमद नयुम , बागवानअतिक अहेमद,मोईन भाई फुलवाले,गीरीष कोत्तवार, काँग्रेस कमिटी शहर युवक अध्यक्ष मुजीब पठाण,जलील भाई कोथिंबीरवाले,कोळी समाज शहर अध्यक्ष रमेशभाऊ बोडके,जितेंद्र पानपट्टे, एकबाल कुरेशी, पिंटू ठाकुर,शेख बबलू, बालाजी सूर्यवंशी,सुभाष चौदंते, केलास चंद्रे,अविनाश चौदंते,विजय मेटकर,शिवा तरोडेकर, रफिक भाई मसाले वाले यासह काँगेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड