रेनबो हॉस्पिटलच्या अथक प्रयत्नाने मृतप्राय महिलेला जिवदान.
नांदेड दि.२७: तेलंगणा मधील खम्मम जवळील एका अतिसामान्य कुटुंबातील ललिता चितोडीया ही एक महिला आठ महिन्याची गरोदर होती.तिचा रक्तदाब प्रचंड वाढून तीन झटके येतात.अन लघवीवाटे रक्तस्राव सुरू होतो,स्थानिक च्या दवाखान्यात नेले पण रुग्णाची मृतावस्था बघता दाखल करण्यास नकार मिळाला.खात्री तर नाहीच पण प्रयत्न केले तर सात ते आठ लाख खर्च सांगितला.नातेवाईकांनी तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास करीत नांदेडला रात्री उशिरा आणले.येथे ही तोच अनुभव आला.भितीने गांगरलेल्या ऋग्नासह नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू झाला व हवालदिल झाले.नाईलाजाने रुग्ण परत घेऊन निघाले असता कुणीतरी रेनबो हाॅस्पिटल ला नेण्याचे सुचवले.नातेवाईंकानी शेवटचा पर्याय म्हणून तिकडे नेले. रेनबो हाॅस्पिटल हे नेहमीच संवेदनशील व मानवतेचे मंदीर समजले जाते.त्याचा प्रत्यय इथेही आला.डाॅ.गोपाल चव्हाणांनी रात्री उशिरा ही त्यांना ताबडतोब दाखल करुन घेत त्वरीत उपचार सुरू केले.पेशंटची दयनीय अवस्था बघता स्वतःच रक्त पिशव्या व इतर आवश्यक बाबी मिळवत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया हाती घेतली.रेनबो हॉस्पिटल ने हे एक आव्हान स्वीकारून आपल्या अनुभवतेच्या बळावर त्या महिलेवर अथक प्रयत्न करून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेला व बाळाला जिवदान दिले.हा जणू वैद्यकिय क्षेत्रात आदर्श प्रस्थापित करणारा असाच प्रसंग आहे. जात ,पात,धर्म ,प्रांत व वेष भाषा यांचे बंधन झुगारून केवळ रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजुन रुग्णालयात आलेल्या रुग्णाला जिवाचं रान करून जेव्हा डॉक्टर जीवदान देतात तेव्हा नातेवाईकांच्या प्रतिक्रिया हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या ठरतात.तसा सुखद अनुभव याप्रसंगी आला.डाॅ.गोपाल चव्हाण आमच्या साठी देव होऊन आले.त्यांचे रेनबो हाॅस्पिटल आमच्या साठी देवालय ठरले.आम्ही त्यांचे ऋण जन्मभर विसरु शकणार नाही.अशा हृदयस्पर्शी प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक राजुसिंग चीतोडीया,रामसिंग चितोडीया नी माध्यमांशी बोलताना दिल्या. नांदेड परीसरातच नव्हे आजुबाजुच्या अनेक जिल्ह्यासह थेट तेलंगणापासुन रेनबो हाॅस्पिटलला रुग्ण मोठ्या विश्वासाने येतात.यशस्वीतेची दर्जेदार खात्री देणारे हाॅस्पिटल म्हणुन सदर दवाखान्याचा सर्वत्र नावलौकिक आहे.या अगोदरही एकापेक्षा एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अतिशय माफक दरात पार पाडण्याचे मानवीय कार्य रेनबो हॉस्पिटल ने पार पाडले आहे. सदर शस्त्रक्रियेसाठी डॉ.अनिल साखरे, डॉ गोपाल चव्हाण, डॉ.स्नेहल सरतापे, डॉ अमोल मोरे, डॉ शिल्पा चव्हाण,भुलतज्ञ डॉ.रामकिशन आवर्दे, फिजिशिअन डॉ.राहुल घंटे, रवी वायवळे सह संपूर्ण रेनबो टिम ने अथक व शर्थीचे प्रयत्न करत एक महिलेसह तिच्या बाळाचे जीव वाचवले त्याबद्दल सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड