हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरा सह तालुक्यातील नागरिकांना येत्या काळात पाणी टंचाई भासू नये यादृष्टीने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि 20 नोव्हेंबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मान्सूनपूर्व पाणी पुरवठा आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना सक्त निर्देश दिले की येत्या 40 दिवसात म्हंनजे जानेवारी पर्यंत शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करून शहरातील नागरिकांची तहान भागवावी असे याबैठकीत सर्व पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतांना त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या….
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरासह तालुक्यातील गावाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न येत्या उन्हाळ्यापूर्वी मार्गे लागावा यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पाणीपुरवठा आढावा बैठक घेतली त्या बैठकीत सर्व शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी निमंत्रित केले होते या बैठकीत सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांना त्यांनी सक्त आदेश दिले की हिमायतनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम येत्या 40 दिवसात पूर्ण करून शहरातील नागरिकांची तहान भागवावी असे त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले येणाऱ्या काळात हिमायतनगर शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मंगरूळ येथील जलाशयातील पाणीसाठा नगर पंचायत प्रशासकीय विभागा मार्फत शहरातील प्रत्येक वार्डा पर्यंत पोहचविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतली त्यात तालुक्यातील 23 गावा मध्ये जल जीवन योजनेचे काम सुरू आहे ते सुद्धा येत्या 4 महिन्यात पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा पाणी टंचाई भासणार नाही ह्याची काळजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घ्यावी असे तहसीलदार ,नायब तहसीलदार व नगर पंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी यांना सांगितले यावेळी तहसीलदार गायकवाड ,नगर पंचायतचे मुख्याधिकारी ताडेवाड,पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद,काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने, पापा पारडीकर,सह आदी जन उपस्थित होते