नांदेड दि.२२: दि. १० व ११ जून रोजी बंगळूर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद ( नॅक) समितीतर्फे महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली . दोन दिवस या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांचे शैक्षणिक उपक्रम , भौतिक सोयी सुविधा , नवीन उपक्रम , विद्यार्थी शिक्षकांची प्रगती , प्रशासकीय बाबी तसेच विद्यार्थी , पालक व माजी विद्यार्थी यांच्याशी संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली तसेच प्राध्यापकांसाठी सर्व गुणसंपन्न असा शेरा त्यांनी दिला . सदर नॅक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ गावीसिद्धाप्पा अंगडी नॅक समन्वयक प्रा. मुबारक सिंग व सदस्य डॉ. अब्दुल कादर हे होते. महाविद्यालयाचे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये सर्व समावेशकता असून आणि समाजाच्या कल्याणासाठी विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्न करतात . प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्याबरोबर विविध विषयांवर कार्यशाळा आणि चर्चासत्र आयोजित करण्यासाठी सतत प्रयत्न कार्यरत असतात . महाविद्यालयाने आपली उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक शिक्षण नवोपक्रम , अध्यापन पद्धती यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 21 व्या शतकात भारताला विश्वगुरू बनविण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे . महाविद्यालयातील शिक्षक शैक्षणिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून शिक्षणातून मूल्याधिष्ठित समाज घडविण्याचे कार्य करीत आहेत या सर्व उपक्रमांमुळे आज महाविद्यालय यशाची विविध शिखरे पादक्रांत करीत आहे . यामुळे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे, तसेच सहयोग संकुलातील विविध विभागातील सर्व प्राचार्यांनी कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॅा. बालाजी गिरगावकर, नेक कॉर्डिनेटर डॉ सोमनाथ पचलिंग, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड