आदर्श आचारसंहिता पथक कोणती कारवाई करेल यांच्याकडे जनतेची लागलेली लक्ष
दिनेश येरेकर
नांदेड दि.२: सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे रणसंग्राम चालू असताना दिवाळीच्या शुभेच्छाच्या वर्षाव करीत असताना या संधीचा फायदा घेत एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दिवाळीच्या शुभेच्छा निमित्त प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि आचारसंहितेचा भंग पावत असल्याचे निदर्शनास येत असून या बाबीचे नायगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला असून या बाबीचे गांभीर्य मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे आचारसंहिता भरारी पथकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे सविस्तर वर्त असे आहे की माझ्या नायगाव विधानसभा मतदारसंघात माझाच विजय झाला पाहिजे या हेतूने थेट मतदारांच्या घराघरात दिवाळीच्या शुभेच्छा व भेटवस्तू देत एक दिवा विकासाचा नायगावाच्या निर्णयाचा अशा अनेक मनी टाकून मतदारांच्या घराघरापर्यंत आपण केलेल्या कामाची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार करीत नायगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार राजे संभाजी पवार हे स्वतःच्या प्रचाराची सुरुवात ही आदर्श आचार्य शेतीचे उल्लंघन करीत वेगळा फंडा वापरून त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या हाती देत असलेल्या एका प्रसिद्धी पत्रकातून दिसून येत आहे दिलेले प्रसिद्धी पत्रकात आणि दिलेल्या भेटवस्तूवर भाजप पक्षाचा कमळ ही निशाणी दाखवून भाजपा नायगाव असा उल्लेख केलेला आहे यासोबतच स्वतःच्या फोटोसह आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची ही भान त्यांना राहिलेले नाही अशावेळी निवडणूक प्रशासनाचे आदर्श आचारसंहिता पथक कोणती कारवाई करेल का आदर्श आचारसंहिता भरावी पथक हे गाठ झोपी गेले की झोपेचे सोंग करीत आहे हा नायगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे चर्चेचा विषय बनला आहे उमेदवारांना दिलेले आचार्य शेतीचे नियम बाजूला सारून मतदारांना आकर्षित करण्याचा कोविडवाना प्रयत्न उमेदवार राजेश पवार यांनी करीत असल्याने आता या उमेदवारांवर निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे नेमणूक दिलेले पथक कोणतीच कारवाई का करत नाही ही नायगाव विधानसभा मतदारसंघातील बांधवांची दिशाभूल नव्हे काय निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून ते निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता भरारी पथकाची नेमणूक करून देण्यात आली असली तरी पण त्या आचारसंहिते मधील नियम व अटी प्रत्येक उमेदवारांना पालन करणे गरजेचे असते निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या माजी आमदार आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राजे संभाजी पवार यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे नायगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने लक्ष लागून आहे.
#सत्यप्रभा न्यूज#नांदेड