राज्यात काल महायुती सरकार स्थापन झालंय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्षांकडे जास्त संख्याबळ आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना आपल्याला जास्त मंत्रीपदं मिळाली पाहिजेत, असं वाटतं. त्यावर चर्चा सुरू (Maharashtra Politics) होती. आता जवळपास ठरलं आहे. 16 तारखेच्या आधी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. गृह खात्यावर प्रश्न विचारताच फडणवीस म्हणाले की, गृह खात्यावरून कोणतीच रस्सीखेच सुरू नव्हती. त्यावर चर्चा सुरू होती, परंतु गंभीर स्वरूपाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले आहेत.
नॉर्मली अर्थ, गृह, नगर विकास हे एक प्रकारचे डिफाईनिंग खाते आहे. तिन पक्ष असल्यामुळे तिन्ही पक्षांना योग्य इज्जत देण्यात आलीय. कामपण होतं आणि तिन्ही पक्षांना समान न्याय मिळाला, हे दाखवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे चर्चा सुरू आहे. गृह खातं स्वत:कडेच ठेवणार का? असं विचारताच देवेंद्र फडणवीस हसले. अंतिम निर्णय झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जनतेने आम्हाला बहुमत दिलंय. एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राच्या राजनैतिक संस्कृतित संवादाला फार महत्व आहे. विरोधकांमध्ये निवडून आलेले 30 ते 32 जण माझे मित्र आहेत. मला 25 वर्ष विधानसभेत झाले आहेत. माझा काही लोकांसोबत व्यक्तिगत परिचय आहेत, त्यामुळे ते माझ्या घरी येतात. याचा अर्थ ते पक्ष सोडून भाजपमध्ये येतील असा नाही.
या निवडणुकीत आम्ही आणलेल्या योजना आणि हिंदुत्वामुळे यश मिळालं आहे. जनतेच्या इच्छेप्रमाणे आम्ही स्थिर सरकार देणार आहोत. विरोधी पक्षांसह सुसंवाद राखण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहोत. तर 16 डिसेंबरआधी निश्चितपणे मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. बेस्ट मुख्यमंत्री नाही तर जनतेसाठी काम करण्यासाठी आलो आहोत, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.