विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२५ :वैष्णवी रमेश वावदणे असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे पती रमेश वावधने (वय २५, रा. हरिओमनगर, रांजणगाव शेणपुंजी) हे पत्नी वैष्णवी व २ वर्षीय चिमुकलीसह शुक्रवारी पुण्याला निघाले होते. पत्नीची वाट पाहत तिरंगा चौकात थांबले. बराच वेळ होऊनही पत्नी न आल्याने त्यांनी सासऱ्यांना कॉल केला. तेव्हा त्यांनी बराच वेळापूर्वी मुलीला रिक्षात बसवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे हादरून गेलेल्या पती व तिच्या वडिलांनी वैष्णवीचा शोध सुरू केला. कुठेही मिळून येत नसल्याने अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
२ दिवसांत शहरातून ७ जण बेपत्ता…
दरम्यान, शहरातील पोलीस ठाण्यांत दोन दिवसांत ७ जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यात ५ महिलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांची नावे : वैष्णवी अमोल भालेराव (वय १९, रा. बजाजनगर, पोलीस ठाणे वाळूज एमआयडीसी), वैशाली भीमराव मिसाळ (वय ३५, रा. रांजणगाव शेणपुंजी, पोलीस ठाणे वाळूज एमआयडीसी), बशिराबी मिनास शेख (वय ६०, रा. मुकुंदवाडी, पोलीस ठाणे मुकुंदवाडी), आसमा ईलूस शेख (वय २९, रा. वाणी मंगल कार्यालय, पोलीस ठाणे जवाहरनगर), नदीमअली हसन अली सय्यद (वय ३०, रा. बुढीलाइन, पोलीस ठाणे सिटी चौक), संजय महादू गायकवाड (वय ५०, रा. हर्सूल, पोलीस ठाणे हर्सूल).
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर