Chhagan Bhujbal : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे जर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते तर ते निवडून आले असते असं वक्तव्य आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. लाडक्या बहिणींचा त्यांना फायदा झाला असता. बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे भी, लढेंगे भी और जितेंगे भी असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. दादागिरी, दडपशाही तिथल्या लोकांना आवडेल तर ते बघतील असेही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. पण, समीरचा राजीनामा स्वीकारला गेला नाही असे भुजबळ म्हणाले.
राजकारण म्हटल्यानंतर आणि निवडणुका आल्या आणि आग्रह केला तर लढावं लागतं. नांदगाव मतदारसंघात आम्हाला बोलावण्यात आले होते. शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अनेक ठिकाणी राजीनामा न देता लोक लढले होते. त्यातील काही निवडून आले, अन् काही पराभूत देखील झाले. निवडणूक लढवायची असेल तर राजीनामा द्या असे अजित पवार यांनी आम्हाला सांगितले होते. त्यानुसार समीर भुजबळ यांनी अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडे राजीनामा दिला होता. कुठलाही पक्ष पाठीमागे नसताना एकट्याच्या जिवावर तो नांदगावमध्ये लढल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मी आणि पंकज भुजबळ यांनी नांदगावात यायचे नाही असे समीरने आम्हाला सांगितले होते. तरी देखील त्याला 50 हजार मते मिळाली हे भूषणावह आहे. कोणताही पक्ष नसताना एकटा लढला होता असे भुजबळ म्हणाले. समीरने राजीनामा दिला पण तो स्वीकारला गेला नाही असेही ते म्हणाले.
मी देखील ओबीसीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता. त्यावेळी माझा सुद्धा राजीनामा स्वीकारला नाही. त्या त्या पक्षाचा तो प्रश्न असतो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते बघतात. अनेक ठिकाणी महायुतीतील दोन दोन पक्ष लढले. मनोज कायदे आमच्या पक्षातर्फे लढला तिथे शिंदे नावाचा आमचाच माणूस पवार गटाकडून लढला. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे पार्टीचा आणखी एक उभा राहिला होता. त्याने स्वतंत्र लढायला पाहिजे होते असे भुजबळ म्हणाले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लढाया झाल्या. युतीतील अनेक लोक पक्ष घेऊन लढले. समीर भुजबळ हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते तर ते निवडून आले असते असे भुजबळ म्हणाले. लाडक्या बहिणींचा त्यांना फायदा झाला असता असे भुजभल म्हणाले.
राजकीय टीका टिपण्णी करतांना पहिल्यासारखा सुसंस्कृतपणा राहिला नाही. 40 वर्षापूर्वी असे नव्हते, त्यावर चर्चा व्हायची. एखादा कायदा आला तर त्यावर चर्चा व्हायची. सर्वजण एकत्र बसून चर्चा करायचे, विरोधीपक्ष म्हणून बघितले जायचे, दुश्मन म्हणून नाही असे भुजबळ म्हणाले. सभागृहात भांडणे नंतर एकत्र चहा घ्यायचे. अटलबिहारी वाजपेयी स्वतः म्हणाले होते, राजीव गांधींमुळे मी वाचलो हे विरोधी पक्षाच्या नेत्याने मांडले होते असे भुजबळ म्हणाले. काळजी, आपुलकी पोटी सर्व बघितले जायचे. पवारसाहेब आजही सर्वांना मदत करतात. सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात त्याकाळी प्रेम होते. आता सर्वच क्षेत्रात विरोध सुरु झाला आहे असे भुजबळ म्हणाले.