Chat GPT : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot) सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे (Chat GPT) मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. कधी आजाराचे निदान करण्यात येत आहे, तर कधी न्यायालयीन कामकाजासाठी चॅट जीपीटीचा वापर केला जात आहे. अशात आता ब्राझीलमध्ये अवघ्या 15 सेकंदात कायदा तयार करुन चॅट जीपीटीने अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी सोडवल्याचे समोर आले आहे. (Chat GPT created the law in just 15 seconds and solved the years-long pending question in a jiffy)
ब्राझीलच्या पोर्तो अलेग्रे शहरात सिटी कौन्सिल सदस्य रामिरो रोसारियो यांनी पाणी मीटरवरील कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी ChatGPT चा वापर केला. हा कायदा अवघ्या 15 सेकंदात तयार झाला. या कायद्यात दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर कृत्रिम बुद्धीमतेतून काही व्यावहारिक उपाय सुचविले. यामुळे केवळ रोसारियोच नव्हे तर संपूर्ण सिटी कौन्सिलला प्रभावित केले. हा कायदा मंजूर करताना कौन्सिलचे अध्यक्ष हॅमिल्टन सोसमेयर यांनी काहीसा संशय व्यक्त केला. पण कायद्याचा मसुदा नीट वाचल्यानंतर तो तातडीने मंजूर करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी एका तरूणाच्या आजाराचं निदान डॉक्टर करू शकले नाही मात्र चॅट जीपीटीने ते अचूक केलं आहे. एक तरूण गेल्या काही वर्षांपासून पाठीच्या मनक्यामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. त्यासाठी त्याने एक नाही तर 17 डॉक्टरांकडून त्यासाठी उपचार घेतले मात्र त्याच्या आजाराचं निदान कोणतेही डॉक्टर करू शकले नाही. त्यानंतर त्यांनी चॅट जीपीटीचा आधार घेत आजाराच्या निदानाचा प्रयत्न केला. चॅट जीपीटीने या तरूणाच्या आजाराचं अचूक निदान केलं.
चंदीगडमध्ये प्रथमच एखाद्या न्यायालायाने पहिल्यांदाच हत्या प्रकरणातील जामिनावर निर्णय घेण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केला होता. पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने फौजदारी खटल्यातील जामीन अर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी हा वापर केला न्यायमूर्ती अनूप चितकारा (Justice Anoop Chitkara) यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठाने जून 2020 मध्ये गुन्हेगारी कट, खून, दंगल आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीनं दाखल केलेल्या जामीन याचिकेच्या सुनावणीवेळी ChatGPT कडून अभिप्राय मागवला. त्यानंतर जामीन फेटाळण्यात आला होता.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड