हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- ह्या वर्षी तालुक्याची सर्वात मोठी शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यासंदर्भात शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे ‘ सार्वजनिक शिव जन्महोत्सव समिती’च्या वतीने एक व्यापक बैठक नुकतीच घेण्यात आली त्या बैठकीत सर्वानुमते शिव जन्महोत्सव समिती 2024 च्या अध्यक्षपदी अरविंद वानखेडे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर लिंगमपल्ले तर सचिव पदी नागेश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे..
याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर शहरात तालुक्यातील सर्वात मोठी दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्या संदर्भात एक व्यापक बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीत ‘सार्वजनिक महोत्सव समिती’च्या वतीने शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2024 च्या अध्यक्षपदी अरविंद वानखेडे ,उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर लिंगमपल्ले तर सचिव पदी नागेश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी उपस्थित डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी गेल्या २० वर्षांपासून शहरात निघत असलेल्या भव्य शिवजयंती संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले शहरातील सर्व धर्म, जाती, पंथ यांना सोबत घेत दरवर्षी ‘शिवमहोत्सव’ साजरा करण्यात येतो त्यामध्ये व्याख्यान, पोवाडे, कीर्तन, अशा विविध माध्यमातून शिव विचार घरा घरात पोहचवण्याच काम समिती मार्फत केले जाते त्याच माध्यमातून यावर्षी गठीत करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सव समितीकडून शहरात यावर्षी भव्य दिव्य शोभयात्रा काढून तालुक्यातील सर्वात मोठी एकमेव अशी शिवजयंती साजरी करण्याचा मानस नव निर्वाचित समितीने घेतला आहे या शिवजयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे शोभायात्रेमध्ये शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती असणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अरविंद वानखेडे, सचिव नागेश शिंदे यांनी दिली आहे त्यामुळे यावर्षीची शिवजयंती मोठ्या थाटा माटात वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढून साजरी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे डॉक्टर राजेंद्र वानखेडे, ज्ञानेश्वर शिंदे,सुनील शिंदे, दत्ता सूर्यवंशी ,गजानन पाळजकर,रामभाऊ सूर्यवंशी ,वामनराव मिराशे पाटील, श्रीकांत सूर्यवंशी,मोहन ठाकरे, गजानन हरडपकर, लक्ष्मण डांगे,पापा शिंदे, मुन्ना शिंदे, गोविंद शिंदे, किरण माने,प्रतीक ठाकरे, शिवम गाजेवार ,सोपान कोळीगीर, अजय माने,प्रदीप नरहरे .विनायक पाळजकर, मंगेश शिंदे,आकाश वानखेडे,परमेश्वर करहाले, हनुमान अरेपल्लू , अक्षय जाधव शुभम हरडपकर, विष्णू चव्हाण, दिपक मोरे,मंगेश धुमाळे, परमेश्वर नागेवाड ,रवी चव्हाण, सीताराम शिंदे,कृष्णा कटारे,जयराम शिंदे,कृष्णा बोलसे ,विनायक ढोणे,अमोल कलाने सह आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते