हिमायतनगर प्रतिनिधी/- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्याला संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला तेव्हापासून संपूर्ण देशामध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून आज गुड मॉर्निंग योगा परिवाराचे योगगुरु गणेश ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहरात योग दिवस साजरा करण्यात आला…..
याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हिमायतनगर शहरातील गुड मॉर्निंग योगा परिवारातील प्रतिष्ठित , व युवा तरुण वर्गांनी आज दि 21 जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिवस असल्यामुळे हिमायतनगर शहरातील तहसील प्रांगणामध्ये सकाळी पाच वाजता योग गुरु गणेश ढोणे यांच्या नेतृत्वाखाली योगा डे साजरा करण्याचा संकल्प केला होता त्या योगा डे ला शहरातील नागरिकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित नवतरुण युवकासह नागरिकांना मार्गदर्शन करताना योगगुरु गणेश ढोणे यांनी असे सांगितले की माणसांच्या दैनंदिन जीवनाच्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॅट्स व हृदयविकारासारख्या गोष्टी घडत आहेत आज काल तरुण वर्गांना सुद्धा खूप मोठे आजार जडत आहेत त्यामुळे योगासन व व्यायामाकडे लक्ष देऊन योग एक विज्ञान आहे रोज योगा केल्याने आपले आरोग्य चांगले राहते असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावरील एका कार्यशाळेत योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले होते त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी 21 जूनच नव्हे तर दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाला एक तास देऊन आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काम करावे असे अनमोल मार्गदर्शक करून करो योग रहो निरोगचे नारे देण्यात आले यावेळी योगगुरू गणेश ढोणे, राजू पिंचा, अशोक गुट्टे, राजू पानपटे ,अशोक सोमेवाड, राम जाधव, वामन पाटील, रवी जाधव, राम शिंदे, जितू वानखेडे, गजानन ताडकुले, अवधूत गायकवाड, शत्रुघन चव्हाण, पत्रकार नागेश शिंदे सह समस्त मॉर्निंग योगा परिवाराचे योगासक मोठ्या संख्येने उपस्थित होते