नांदेड दि.२: सारथी महाज्योती व सारथी संस्था बार्टी संस्थेच्या धर्तीवर त्या-त्या समाजातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य घडविण्याचे प्रयत्न करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात संशोधक विद्यार्थ्यांना मिळणाऱी फेलोशिप २०२१ व २०२२ या वर्षी प्रमाणे २०२३ मधील सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासुन मिळावी या मागणीसाठी विद्यार्थी उपोषण करीत आहेत. महाज्योती संस्थेच्या फेलोशिप करीता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे ३८ दिवस तर , सारथी चे विद्यार्थ्यांनी नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे येथे सातत्याने 80 दिवसापासुन उपोषण करत आहेत, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान सुदघा उपोषण केले आहे. या बाबत वेळोवेळी मागण्यांबाबतचे पत्रव्यवहार विद्यार्थ्यांनी केलेले आहे.
सारथी व महाज्योती संस्थेच्या प्रमाणेच बार्टी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सदर मागण्यांसाठी एक मोठा संघर्ष केला आहे. दि. ३०/१२/२०२३ रोजी या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत संस्थेच्या व्यवस्थापकां मार्फत १०/१२/२०२३ रोजी होणारी संशोधक पात्रता परीक्षा रद्द करणे बाबत व १ जानेवारी २०२२ पासुन नोंदणी असणाऱ्या व अर्ज करणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासुन फेलोशीप देण्या बाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाज्योती व सारथी संस्थेच्या २०२३ मध्ये आलेल्या जाहिरातींमध्ये अर्ज करणारे विद्यार्थी हे १ जानेवारी २०२२ पासुन नोंदणी असणारे आहेत. त्यामुळे सारथी व महाज्योती संस्थेने ही अशा सर्व विद्यार्थ्यांचा बार्टी संस्थे प्रमाने सहानुभूती पुर्वक निर्णय करावा. आणि मागील 2 दिवसापासून पुणे येथे चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला थांबवून त्यांचे रक्षण करावे.
सारथी व महाज्योती संस्था ही बार्टीच्या धर्तीवरच स्थापन झालेली संस्था आहे. बार्टी संस्थेच्या व्यवस्थापकांना परीक्षा रद्द करण्या बाबतचे अधिकार आहेत म्हणजेच इतर ही संचालकांना तसे अधिकार आहेत. त्यामुळे ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून संचालकांना तसे आदेश करून त्यांच्या स्तरावर परीक्षा रद्द करण्या बाबतचा निर्णय आजच जाहीर करून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व बार्टी संस्थे प्रमाणे आपणही अर्ज करणाऱ्या व पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासुन फेलोशिप देण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे सादर करावी ही विनंती.
तरी सदर मागण्यां मान्य न झाल्यास 06/01/2024 रोजी आम्ही सर्व विद्यार्थी ITI कॉर्नर, महात्मा फुले चौक येथे निदर्शने करू व पुणे येथील उपोषणा दरम्यान विद्यार्थ्यांच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास दोन्ही संस्थेचे संचालक सर्वस्वी जबाबदार राहतील.
वरील निर्णय येत्या दिनांक 5 जानेवारी पर्यंत न घेतल्यास 6 रोजी महात्मा फुले पुतळा iti येथे तिव्र निदर्शने/अंदोलन करण्यात येईल…..! असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
सारथी महाज्योती व्यवस्थापक, यांना निवेदनदनाद्देवारे देण्यात आला यावेळी
तुषार देशमुख,गणेश वडजे, दत्ता येवले, गोविंद सुर्यवंशी, अर्जुन ढोणे, ज्ञानेश्वर ठाकुर, महेश हंबर्डे, महेंद्र कदम मंगेश कदम,
कुडंलिक काळे गणेश बोबडे यासह असंख्य तरुण तरूणींचां सहभाग होता
#सत्यप्रभा न्युज #नांदेड