छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विजय पाटील दि.२०: स्कार्फ बांधलेल्या दोन महिला, अवघी १४ मिनिटे… हात चलाखीने हिरेजडित बांगडी लंपास केली… या बांगडीची किंमत तब्बल १ लाख ३१ हजार रुपये… दर्गा रोडवरील कॅरेटलेन ज्वेलरी दुकानात १३ सप्टेंबरल रोजी दुपारी तीनला ही घटना घडली… अशा पद्धतीने ज्वेलर्स दुकानात चोरी होण्याची ही तिसरी घटना. जडगाव ज्वेलर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्सनंतर फॅरेटले ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली आहे. १८ सप्टेंबरला दागिन्यांच्या तपासणीत बांगडी मिळून न आल्याने, सीसीटीव्ही फूटेज तपासले असता ही बाब समोर आली आहे.
या प्रकरणात मॅनेजर आकाश शिंदे (रा. वय २८, रा. सुरेवाडी, टीव्ही सेंटर) यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन महिला स्कार्फ घालून खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. दुकानातील स्टाफ जेवण करण्यासाठी गेला होता. दुकानात दोन युवती काम करत होत्या. याचा फायदा उचलत युवतींना त्यांनी अंगठ्या, बांगड्या दाखवण्याची मागणी केली. कर्मचारी युवती दागिने दाखवत असताना हातचलाखीने चोर महिलांनी तेथील एका स्टँडमध्ये ठेवलेली हिरेजडित बांगडी लंपास केली. दालनाच्या दागिन्यांच्या तपासणीत बांगडी गायब असल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर स्कार्फ बांधलेल्या महिलांनी चोरी केल्य
या प्रकरणात मॅनेजर आकाश शिंदे (रा. वय २८, रा. सुरेवाडी, टीव्ही सेंटर) यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन महिला स्कार्फ घालून खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. दुकानातील स्टाफ जेवण करण्यासाठी गेला होता. दुकानात दोन युवती काम करत होत्या. याचा फायदा उचलत युवतींना त्यांनी अंगठ्या, बांगड्या दाखवण्याची मागणी केली. कर्मचारी युवती दागिने दाखवत असताना हातचलाखीने चोर महिलांनी तेथील एका स्टँडमध्ये ठेवलेली हिरेजडित बांगडी लंपास केली. दालनाच्या दागिन्यांच्या तपासणीत बांगडी गायब असल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर स्कार्फ बांधलेल्या महिलांनी चोरी केल्याचे समोर आले. सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.सलग तिसरी घटना घडूनही स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस या महिलांचा छडा लावू शकलेले नाहीत.
# सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर