हिमायतनगर दि.३: तालुक्यातील जाज्वल्य देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील विद्यार्थ्यांची शासकीय सेवा करण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. येथील कु. गीता देवन्ना शेन्नेवाड यांची संभाजीनगर येथे पोलिस म्हणून तर शिवराम कैलास काईतवाड यांची नांदेड येथे पोलिस म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुका संघटक संजय काईतवाड यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी हे गाव एकेकाळी कुस्तींच्या मल्लांसाठी प्रसिद्ध होते पण हळूहळू परिस्थिती बदलत जाऊन या गावातील अनेक नवतरुण युवक व युवती आता शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी जिद्द व चिकाटीने परिश्रम घेऊन अभ्यास करताना दिसून येत आहेत याच जिद्द व चिकाटीवर या गावातील असंख्य विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत नेत्र दीपक यश संपादन करण्याची परंपरा सुरू आहे अशातच नुकताच जाहीर झालेल्या पोलीस भरतीच्या निकालात बोरगडी येथील शिवराम कैलास काईतवाड या नवतरुण युवकाची नांदेड पोलीस म्हणून निवड झालेली आहे तर याच बोरगडी गावातून पहिल्यांदाच महिला पोलीस म्हणून बहुमान मिळवणाऱ्या गीता देवन्ना शेन्नेवाड हिची संभाजी नगर येथील पुलिस दलात नियुक्ती झाली आहे या दोन्ही गुणवंतांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर,हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सह तालुका संघटक संजय काईतवाड यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड