विजय पाटील
सातारा दि.२२:
दोन चिमुरड्या मुलींना कमरेला बांधून तलावात उडी घेत ऐश्वर्या स्वप्निल चव्हाण (वय २५) या विवाहितेने जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधील धामणी गावात सोमवारी (२१ ऑक्टोबर) मध्यरात्रीनंतर घडली. आज सकाळी हा थरार समोर आला. घटना कळताच पती स्वप्नील बापूराव चव्हाण (वय ३०) यानेही विष पिले. त्याच्यावर म्हसवड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
सहा वर्षांपूर्वी स्वप्निलचा विवाह ऐश्वर्याशी झाला होता. ते माण तालुक्यातील चव्हाण वस्तीत राहत होते. स्वप्नील गवंडीकाम करतो. त्यांना ३ मुली आहेत. संसार सुखाचा सुरू असताना ऐश्वर्याने सोमवारी मध्यरात्री घराशेजारी असलेल्या तलावात स्वरांजली (वय ६), तर शिवानी (वय ३ महिने) या चिमुकल्यांना कमरेला बांधून उडी घेतली. ऐश्वर्यासह दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. तीन वर्षांची तिसरी मुलगी आजीजवळ झोपलेली असल्याने ऐश्वर्या तिला नेऊ शकली नाही, म्हणून ती वाचली.
#सत्यप्रभा न्यूज #छत्रपती संभाजीनगर