राम गाढे पाटील यांनी पुरविला लेकीचा बालहट्ट…
नांदेड दि.३०: येथील आनंदनगर भागातील फायनान्शियल ॲडव्हायझर राम गाढे पाटील यांनी त्यांच्या सहा वर्षीय कन्येच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीच्या बालहट्टा खातीर रक्तदान करून वाढदिवस साजरा केला
याविषयी सविस्तर वृत्त असे की राम गाढे पाटील यांची कन्या अयोध्या हिचा २७ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त कुमारी आयोध्या हिने वडिलांकडे इच्छा व्यक्त केली ती म्हणजे ती म्हणाली की,पप्पा तुम्ही पण माझ्या बर्थडेला ला रक्तदान करा ना,
लोकं कसे राजकारणी लोकांच्या बर्थडे ला ला रक्तदान करतात..
तिच्या या बाल मनाच्या इच्छे खातीर वडिलांनी मुलगी अयोध्या च्या जन्मदिवशी जिजाऊ ब्लड बँक शिवाजीनगर येथे स्वतः आपल्या कन्या समवेत जाऊन रक्तदान करून समाजापुढे एक नवा पांयडा प्रस्थापित केला आहे
चौकट
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही केले होते अयोध्या हिचे कौतुक …!
मनोज जरांगे पाटील यांच्या जूलै महिन्यातील नांदेड दौऱ्या दरम्यान कू. आयोध्या हिने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर कविता सादर करून अनेक उपस्थितांची मन जिंकली होती तिच्या या कवितेबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी तिची जवळ घेऊन स्तुती केली होती व व या चिमुकलेच्या हुशारीचे तोंडभरून कौतुक केलं होतं.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड