हदगाव हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या नेतृत्वामध्ये आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी अकरा वाजता एक बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या कार्यक्रमात हदगाव येथील भाजपा व युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आल्या व मोठ्या संख्येने येथील भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न करण्यात आला या पक्षप्रवेश सोहळ्या मुळे हदगाव शहरात शिवसेनेला मात्र मोठा खिंडार पडल्याचे बोलल्या जात आहे….
यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर पाटील यांनी असे सांगितले की भारतीय जनता पार्टीचे देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी व देशाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब व माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील यांच्या नेतृत्वामध्ये देशासह महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे खूप मोठे काम सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना कुठल्याही जातीपातीचा विचार न करता सर्व जाती धर्मांना एक करून जिल्ह्यात भाजपाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या पक्षप्रवेशांमुळे हदगाव शहरातील शिवसेनेला मात्र मोठ्या प्रमाणात खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे
यावेळी जिल्हा सरचिटणीस लताताई फांळके, जिल्हा सरचिटणीस प्रवीणजी गायकवाड, विजयराव टेळके पाटील,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील कामारीकर, भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव पाटील,हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन चायल,शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे, शीतल सेवनकर,शहर अध्यक्ष मारोती सुर्यवंशी,संतोष पेळे,तुषार पाटील घोगरे,विकास माहूरकर, साई बाभूळकर,सुशील नावडे,सह असंख्य भाजपा व युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…