महाराष्ट्र/हिंगोली लोकसभा प्रतिनिधी /- भारतात सध्या अनेक राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुराळा बघायला मिळतोय. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष आप आपल्या परीने जोमाने प्रचार करू पाहत आहेत यातच हिंगोली लोकसभेचे संयोजक डॉ.श्रीकांत पाटील यांना वरिष्ठानतर्फे तेलंगणा निवडणुकीत राज्याच्या वॉर रूम चे सल्लागार व काही विधानसभांमध्ये प्रचार करण्याची मोठी जवाबदारी देण्यात अली आहे त्या प्रचारा दरम्यान केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष श्री. किशन रेड्डी यांच्या बरोबर नामपल्ली मतदारसंघात पदयात्रा प्रचार केला. IT आणि सोशिअल मीडिया प्रदेश सचिव समीरनजी व अभिलाषाजी व संपूर्ण टीम सोबत चर्चा केली. तेलंगणा निवडनूक प्रभारी माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सह जाहीरनामा तयार करण्यात सहभाग नोंदवला व राष्ट्रीय मंत्री भाजपा श्री अरविंद मेनन यांची भेट घेतली यावेळी बोलतांना डॉ. श्रीकांत पाटील यांनी असे सांगितले की हिंगोली लोकसभा 6 महिन्यात पिंजून काढला असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांचा मध्य प्रदेश, तेलंगणा, दिल्ली सह इतर राज्यातील राजकारणात वाढता प्रभाव बघून त्यांनी हिंगोली लोकसभेसाठीची फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.तेलंगणा राज्यात भाजपा मजबूत करण्यासाठी वॉर रूम व जाहीरनामा तयार करण्याची मोठी जबाबदारी डॉ श्रीकांत पाटील यांच्यावर देऊन त्यांच्या कडे असलेल्या अनुभवाचा उपयोग तेथील संघटन करून घेत आहे श्रीकांत पाटील यांच्याकडे मध्य प्रदेश व अन्य कांही राज्यांतील निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे वॉर रूम च्या माध्यमातून तरुणांना व सर्व वर्गांना आकर्षित करण्याचा प्रयत्न तेलंगाना भाजपा संघटन करत आहे.
सध्या महाराष्ट्रात डॉ श्रीकांत पाटील यांच्याकडे लोकसभा संयोजक अशी जबाबदारी आहे पण त्यांचा अनुभव व राष्ट्रीय व बऱ्याच राज्यात असलेल्या संपर्कामुळे त्यांना मोठ मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत व त्यांच्या कौशल्याचा उपयोग हा राजकीय व संघटनसाठी बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे डॉक्टर श्रीकांत पाटील यांना देशभरात राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाते कित्येक निवडणुकांमध्ये त्यांनी रचना लावून दिलेले आहेत याचाच भाग म्हणून तेलंगाना भाजपा प्रदेश अध्यक्षांनी त्यांना मोठे जबाबदारी दिली आहे यावेळी माजी मंत्री श्री प्रकाश जावडेकर जी संघटन मंत्री अरविंद मेनोन जी, संघटन मंत्री सुनील बन्सल जी व व प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री श्रीजी केशन रेड्डी जी उपस्थित होते