
हिमायतनगर प्रतिनिधी /-
जिल्ह्यात भा.ज.पा.ला मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून संघटन पर्वाची मराठवाडा विभागीय बैठक नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे दि 14 फेबूवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, व खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे सांगितले की आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांसाठी सदस्य नोंदणी मोहीम खूप महत्त्वाची असणार आहे त्यासाठी प्रत्येकानी बूथनिहाय सक्रिय सदस्याची नोंदणी करा असे आव्हान उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे यावेळी हिमायतनगर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी 1000 सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला व त्यांच्या टीमचे स्वागत केले

याबाबत सविस्तर वृत्त असे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे त्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना येत्या काळात पद भोगायचे असल्यास त्यांची कुठल्याही प्रकारची शिफारस पक्षाकडे चालणार नाही 1000 सदस्य नोंदणीचा टप्पा पार करून पक्षाकडे पद आणि प्रतिष्ठा मागण्यासाठी यावे त्या सदस्य नोंदणीचा विचार करूननच आपल्याला आगामी काळात निवडणूक लढण्याची संधी भाजपा देणार आहे असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित संघटन पर्व विभागीय कार्यशाळेत बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर खासदार अशोकराव चव्हाण, मंत्री मेघनाताई बोर्डीकर, भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण ,प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, संघटन मंत्री संजय गोडगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार तुषार राठोड, आमदार श्रीजयाताई चव्हाण ,आमदार राजेश पवार, आमदार तानाजी मुटकुळे, नांदेड प्रभारी जिल्हाध्यक्ष अमर राजूरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख सह आदींची उपस्थिती होती यावेळी मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील भाजपा सदस्य नोंदणी मध्ये तीन विधानसभा अग्रेसर आहेत त्या विधानसभेमधील कर्तुत्वान कार्यकर्त्यांचा सन्मान येत्या काळात पक्ष करणार आहे तत्पूर्वी हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गजानन चायल यांनी हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात या भागाचे आमदार शिवसेनेचे असताना सुद्धा त्यांनी हिमायतनगर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची ताकत वाढवण्यासाठीजे परिश्रम घेतले व पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1000 सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना त्यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या टीमचा सन्मान केला व येणाऱ्या काळात अजून या मतदार संघात भाजपाचे संघटन वाढविण्यासाठी काम करा असे सांगितले या कार्यशाळेत नांदेड ,लातूर, हिंगोली सह परभणी जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते