नांदेड दि.११: नुकतेच भारत देशामध्ये भ्रष्टाचाराचा घबाड ईडी ने झारखंड, ओरिसा मध्ये उघड केलेला असून त्याची रक्कम 300 कोटी पेक्षा अधिक मोजण्यात आलेली आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार काँग्रेसच्या खासदार मार्फत झालेला उघडकीस आलेला आहे त्या मुळे या भ्रष्ट काँग्रेस खासदार धीरज शाहू चा निषेध करण्यासाठी नांदेड महानगर मोर्चाच्या वतीने लोकसभा संयोजक सौ प्रणिता ताई देवरे चिखलीकर, महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, प्रदेश सचिव देविदास राठोड, नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर अध्यक्ष सौ श्रद्धाताई सुशीलकुमार चव्हाण यांनी नांदेड मध्ये जोडेमारो आंदोलन करून धीरज शाहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. व भाजपा महिला मोर्चा तर्फे धीरज शाहू विरोधात त व काँग्रेस पक्षाचे विरोधात मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. सदरील कार्यक्रमास भाजपा सरचिटणीस अनुराधा गिराम, रागिनी जोशी,महादेवी मठपती, उपाध्यक्षा संध्या गाजरे, अंजली जोशी, वैशाली देबडवार, मोनिका जिंदल, निती मित्तल, लीना गायकवाड, नीलिमा देशपांडे,आश्विनी पत्की, जयश्री राठोड, शारदा आबादार, सुफलाताई बारडकर, अमृता जोशी, सुमन मामीडवार, यशोदा केंद्रे, उज्वला जायभाय, पुष्पा वानखेडे, सुरेखा लांबे, शततारका पांढरे, अर्चना शर्मा, कांचन गहलोत, अपर्णा चितळे, सरचिटणीस शितल खांडील, विजय गंभीरे, अरविंद भारतीया, सुशीलकुमार चव्हाण, अनिलसिंग हजारी, राजेंद्रसिंघ पुजारी, आशिष नेरलकर, मारुती वाघ, क्षितिज जाधव, विशाल शुक्ला, राजेश ठाकूर, उमेश सरोदे, बालाजी शेळगावकर, शरद यादव, हरभजन सिंग पुजारी, संतोष कदम, जनार्धन वाकोडीकर, प्रणय गंभीरे, नरेश आलमचंदाने, संजीव जिंदाल सचिन मित्तल, संदीप पावडे इत्यादी शेकडो कार्यकर्ते आंदोलनास उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड