हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील मौजे सरसम येथील ग्रामपंचायतवर मागील पंधरा वर्षांपासून एक हात्ती सत्ता मिळवत मागील पाच वर्ष उपसरपंच पद भोगत अनेक नागरिकांची कामे करणारे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कडवट निष्ठावंत विश्वासू शिवसैनिक राम गुंडेकर यांची ओळख आहे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख बदलाचे वारे वाहत आहेत त्यामुळे सर्वांच्या परिचयाचे व सर्वांना ओळख असलेले एकमेव नेतृत्व म्हणून शिवदूत राम गुंडेकर सरसमकर यांच्याकडे पाहिले जाते तालुकाप्रमुख पदासाठी चार जण इच्छुक असल्याने आघाडीवर राम गुंडेकर यांचे नाव असल्याने त्यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर येथे दिनांक सात डिसेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुका प्रमुख पदाच्या निवडीसाठी एक बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये अनेक जणांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितले त्यात शेवटच्या टप्प्यात तालुका प्रमुख पदासाठी चार जण इच्छुक असल्याचे सांगण्यात आले त्यामध्ये शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड, बोरगडीकर ,शिवदूत राम गुंडेकर, तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे, शाहिर रामराव वानखेडे, हे चार जन इच्छुक असल्याकारणाने त्यांच्या निवडीचा अंतिम निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा असल्यामुळे तालुकाप्रमुख पदाचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे हिंगोली लोकसभेचे खासदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या घराण्याशी व मातोश्रीचे शिवदूत म्हणून तालुक्यात परिचित असलेले राम गुंडेकर यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे त्यामुळे हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख पद कोणाच्या गळ्यात पडणार हे मात्र पहावे लागणार आहे…