मुदखेड/प्रतिनीधी शेख जब्बार दि.२३: स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणारे,अशिक्षित असूनही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे व त्याचा प्रचार-प्रसार करणारे,दिवसा गावातील घाण साफ करणारे आणि संध्याकाळी भजन व किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील उच्च-निचतेची,अंधश्रद्धेची, असमानतेची घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक माधव कदम,कैलास गोडसे,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे,संजय आऊलवार,चांदू बोकेफोड,पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते,धोबी समाजाचे तालुकाध्यक्ष संतोष सावंत,शिवसेना शहरप्रमुख सचिन चंद्रे,खंडेराय वडे,सूर्यकांत चौदंते,,विठ्ठल आचार्य,प्रितमसिघं ठाकूर, गंगाधर पाटील मगरे,राम हामंद, विनोद वाघमारे, संदेश वाघमारे,पत्रकार शमशुद्दीन भाई, पत्रकार हाफिझ कुरेशी, आकाश सोनटक्के, संजय बोकेफोड,विजय मेटकर, गजानन सोनटक्के,राजू बोकेफोड आदींची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड