नांदेड दि.५: नऊ दिवसापुर्वी घडलेल्या चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस अटक करून गुन्हयातील चोरी गेलेला माल हस्तगत करण्याचे आदेश मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोनि श्री अतुल भोसले, पोस्टे बिलोली यांना दिले होते.
यातील फिर्यादी नामे अली अब्दुल रशीद चाऊस, वय २८ वर्षे, व्यवसाय किराणा दुकान रा. छोटी गल्ली बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वा. चे सुमारास तक्रार दिली की फिर्यादीचे आईने महिला बचत गटाचे उचलुन आणलेले साठ हजार रूपये फिर्यादीने घराकडे जाऊन ठेवण्यासाठी त्याचे दुकानासमोरील स्कुटीच्या डिकीत ठेवुन किराणा दुकान बंद करून परत घरी जाण्यासाठी निघाला असता डिकीतील ६०,००० /- रूपये हे कोणतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले वगैरे फिर्यादी वरून पोस्टे बिलोली गुरन १७४/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.सं-२०२३ कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी पोहेकॉ २३५१ मारोती मुददेमवार यांचेकडे दिला. सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता तेथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेत होते. आरोपीचा शोध घेत असतांना संशयीत आरोपी नामे शेख इम्रान शेख सलीम, वय २१ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. इदगाह गल्ली बिलोली यास ताब्यात घेवुन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा मिच केला असुन गुन्हयातील चोरलेली रक्कम साठ हजार रूपये पंचासमक्ष काढुन दिली आहे. अशा प्रकारे बिलोली पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणुन चांगल कामगीरी केलेली आहे.
सदरची कामगीरी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. हानपुडे पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी बिलोली, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि शिंदे, पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकॉ एम एस मुददेमवार, पोकॉ व्यंकट घोंगडे, यांनी अथक परिश्रम घेऊन चांगली कामगीरी केलेली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड