नांदेड दि.१९: -नांदेड जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतरावज चव्हाण सभागृहात आज बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महारज यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्याहस्ते श्री शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ संजय तुबाकले, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा
उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्रार्थमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डाॅ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीप बनसोडे, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी थोरात, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे, जिल्हा कृषी अधिकारी नीलकुमार ऐतवाडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी चन्रा आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले.
जिल्हा परिषदेतील कार्यक्रम संपल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवान करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद परिसरात शिवचरित्र गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर शिवराज भद्रे, शिवस्वामी मठपती आणि संचांनी बहारदार गीते सादर करून प्रबोधन केले. या कार्यक्रमाला बाबुराव पुजरवाड, बालाजी नागमवाड, डॉ. उत्तम सोनकांबळे, शुभम तेलेवाड, अशोक कासराळीकर, राजेश जोंधळे, धनंजय वडजे, सचिन गुंडाळे, प्रमोद गायकवाड, कमल दर्डा, दिनकर जोंधळे, ज्ञानेश्वर वानखेडे, गजानन शिंदे, एध.डी. कदम, शिवसांभ चड्डू, आनंद सावंत, ए.एन.सोळंके, शिवकुमार देशमुख, गुलाब वडजे, संजय देशमुख, मोहन अडकिने, बी. के. पाटील, शिवराज तांबोळी, किशन बिडवे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड