नांदेड दि.२९ : ३४ वर्षापासून बंद पडलेल्या बंधा-याचे जुने बांधकाम आवशेष पाडणे व शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करूण मिळावे या मागणीसाठी शेतकरी नेते रमेश पवार पाथरडकर यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद केले आहे की आम्ही सर्वजन मौजे पाथरड ता. हदगांव जि. नांदेड येथील रहिवाशी असून गट क्रं. १४७ मध्ये आसलेल्या बंधारा मागील ३५ वर्षापसून बंद आहे तरी सदर बंधाऱ्यामुळे बंधाऱ्याच्या पुरामुळे बंधाऱ्याला कचरा व फरसान आडकुन पुराचे पाणी शेजारील शेतातून वाहत आहे. त्यामुळे खालील गट क्र. १४२,१४३,१४५,१४७, यासह अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिकाचे नुकसान होत आहे. तसेच या शेतकऱ्यांना आतापर्यत पुराच्या पाण्याणे झालेली नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच या वर्षी या जुन्या बंधाऱ्याखालील २०० मिटरवर नवीन बंधारा होत आहे. परंतु त्यांनी जुना बंधारा अद्याप पाडला नाही पडक्या अवस्थेत असलेल्या बंधाऱ्यामुळे गट क्र १४७ मध्ये १० ते १२ गुटे जमिन नदी पात्रात गेली आहे. वारंवार तहसिल कार्यालय हदगांव येथे अर्ज करून सुध्दा हा प्रश्न मार्गी लागला नाही यावेळी तरी आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी नेते रमेश पवार पाथरडकर यांनी केली नयावेळी शेतकरी गोविद पवार,कान्होबा पवार,पंडीत पवार,जांबुतराव पवार,बालाजी पवार ,दिलिप पवार विठ्ठल पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड