हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी तर्फे दिनांक 16 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या नगरीमध्ये होत असल्याने त्या पर्वावर हिमायतनगर तालुक्यातील भावीक भक्तांसाठी ह.भ.प.आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या मधुर वाणीतून भव्य संगीतमय राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे या राम कथेचा तालुक्या सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री परमेश्वर मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे…..
याबाबत सविस्तर वृत्त असे की पवित्र आयोध्या नगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य व दिव्य अशा राम मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2024 रोज सोमवारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्या पार्श्वभूमीवर श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून परमपूज्य आचार्य गजेंद्र महाराज यांच्या मधुर वाणीतून राम कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या कथेची सुरुवात दिनांक 16 जानेवारी दुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान होणार आहे या राम कथेची सांगता दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे त्यानंतर श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे व प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण सकाळी साडे अकरा वाजता श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दाखवण्यात येणार आहे व प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापनेच्या एक दिवस अगोदर दिनांक 21 जानेवारी रोजी पासून श्री परमेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसरात 5000 दिवे लावून प्रभू श्रीरामाचे नमन करण्यात येणार आहे त्यासाठी या भव्य राम कथेचा लाभ तालुक्या सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून करण्यात आली आहे…